कोंढाळा येथिल हिरकणी फुड्स नी मीळवीला महाराष्ट्र बीजनेस आयकाॅन अवार्ड
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नाशिक , 19 जुलै – नुकताच महाराष्ट्र बिजनेस आयकाॅन अवार्ड वितरण कार्यक्रम, केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार व सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत यांच्या हस्ते दिनांक 8 जूलै ला नाशिक या ठीकाणी वितरीत करण्यात आला. यात गडचिरोली जिल्हातील कोंढाळा येथिल हिरकणी फुड्स या उत्पादक कंपनीने गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आपल्या उद्योगाची सुरवात करून खुप कमी वेळात ग्रामीण तथा शहरी भागात आपले एक स्थान निर्माण केले आहे. ह्या सर्वांची नोंद घेत नाविन्यपुर्ण व सर्जनशिल क्षेत्रातील रिसेल तर्फे यंदाचा सर्वोत्कृष्ट बिजनेस आयकाॅन अवार्ड देवून सन्मान करण्यात आले आहे .
हीरकणी फुड्स कंपनी च्या माध्यमातून मसाले, बेसन,मिरची पावडर,हळद पावडर,धने, इत्यादी प्रकारचे उत्पादने घेतली जातात.खरं तर कोरोणा काळानंतर अनेकांचे रोजगार गेले होते आधीच रोजगार कमी असलेल्या जिल्हात परत बेरोजगारी चे प्रमाण वाढले होते. पण ग्रामीण भागातील तरूणांनीही अश्या परिस्थितित हार न मानता एकमेकांसाठी परत उभे राहुन परिस्थितिशी दोन हात करावे असा विचार करत नितून सिताराम मोहुर्ले या उच्च शिक्षीत तरुणानी आपल्या मीत्रांना सोबत घेत ह्या हिरकणी फुड्स उद्योगाचा प्रवास 9 सप्टेंबर 2021ला सुरू केला. मित्रांनी मित्रांसांबोत मिळून मित्रांसाठी बेरोजगारी वर मात करायला केलेली एक सुंदर सुरवात म्हणजे हिरकणी फुड्स असे मत हिरकणी चे फाउंडर नितून मोहुर्ले यांनी नाशिक येथिल पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. प्रामुख्याने ग्राहकांसाठी योग्य आणि कोणत्याही मीश्रीत रसायनांशीवाय आरोग्यासाठी उपयुक्त अश्या सेंद्रीय अन्न व मसाल्यांचे उत्पादन करणे.
तरूण बेरोजगारांच्या हाताला काम देत रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. व स्थानीक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे अश्या बहुउद्देशांतून ह्या हिरकणी फुड्स कंपणीचा प्रवास गडचिरोली जिल्हात सुरू झाला व त्यांची नोंद घेत महाराष्ट्र बिजनेस आयकाॅन अवार्ड देवून गौरवीण्यात आले. ह्या मित्रांनी केलेल्या सुंदर सुरवातीला परत पुढे नेवून अनेकांच्या हाताला रोजगार देण्याचे उद्देश्य आहे ते आम्ही पुर्णत्वास नेवू असे मत कार्यक्रमादरम्यान नितून मोहुर्ले यांनी व्यक्त केले.व त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी पंकज खोडवे, प्रतीक चौधरी, मयुर चौधरी, नेहल रामटेके,चंदू ठाकरे,संतोष धोटे, बाळू रामटेके व त्यांचे मामा टिकराम शेंडे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्व मित्र परिवाराला व कोंढाळा येथिल सर्व जनता व आपल्या सर्व कस्टमर यांना दिले.
हे पण वाचा :-
Comments are closed.