Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2025: मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2025 करीता मतदान दिनांक 03 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत मतदान केंद्र क्र. 1/1 – गडचिरोली, जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जुने शल्य चिकित्सक कक्षाजवळ, तळमजला, कॉम्प्लेक्स, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे होईल. मतदान प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडावी, तसेच जास्तीत जास्त वैद्यक क्षेत्रातील मतदारांनी आपला लोकशाही हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

मतदान करतांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र मतदाराने सोबत आणणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.