Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील दीड लाख साखर कामगारांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि कामगार महासंघ यांच्या संयुक्त बैठकीत आज सांगली येथे हा निर्णय घेण्यात आला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क :- 30 नोव्हेंबर 20 20 रोजी पहाटे चार वाजल्यापासून हे साखर कामगार संपावर जाणार आहेत. अशी माहिती साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली. साखर कामगारांच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

साखर कामगारांच्या वेतनाचा करार 31 मार्च 2019 रोजी संपला आहे, असे सांगून ते म्हणाले, साखर कामगारांच्या पगार वाढीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याची मागणी व्यवस्थापनाने त्यावेळी मान्य केली. पण त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय साखर कामगारांनी घेतला आहे. राज्यात एकंदर 274 साखर कारखाने आहेत. कराड येथील सहकार मंत्र्यांच्या सह्याद्री साखर कारखान्यापासून या संपाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व साखर कारखाने एकाच वेळी बंद केले जातील असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

Comments are closed.