Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘शौर्य, धैर्याची महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा, अग्निशमन सेवा पदक विजेत्यांचे अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, डेस्क 25 जानेवारी:- ‘महाराष्ट्राला इतरांच्या रक्षणासाठी धावून जाण्याची परंपरा आहे. या परंपरेत शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली आहे,’ अशा शब्दांत अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदक पटकाविणाऱ्या पोलीस अधिकारी- कर्मचारी, तसेच जीवन रक्षा आणि अग्निशमन सेवा पदक पटकाविणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘ महाराष्ट्र म्हटले की, इतरांच्या रक्षणासाठी आघाडीवर राहणारा प्रदेश अशी ओळख आहे. ही महाराष्ट्राची दिमाखदार परंपरा पोलीस दलात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या शूरवीरांसह, इतरांच्या बचावासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारे आणि आगीसारख्या दुर्घटनेत सर्वात पुढे राहणाऱ्या बहाद्दरांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने उजळून टाकली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आणि अग्निशमन दलातील शूरवीरांनी कोरोना काळातही अजोड अशी कामगिरी बजावली आहे. या सर्वांना त्यांच्या कामाची राष्ट्रीयस्तरावरून दाद मिळते आहे. ही महाराष्ट्रासाठीही गौरवशाली बाब आहे. या सर्वांच्या कामगिरीतून या क्षेत्रात येणाऱ्या होतकरून पिढ्याही निश्चितच प्रेरणा घेतील. या पुरस्कारासाठी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच या त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीत त्यांना घरातून साथ देणाऱ्या कुटुंबियांचे आणि जीवलगांचे, मार्गदर्शक यांचेही अभिनंदन.’

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला भारत सरकारकडून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय आणि सर्वोच्च अशा कामगिरींसाठी पदक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील १३ पोलिसांना शौर्य पोलीस पदक, चार अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक, चाळीस अधिकाऱ्यांना गुणवत्तेपुर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक अशी एकूण ५७ पदके जाहीर झाली आहेत. कारागृह सेवेतील तिघांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अग्शिशमन सेवेतील चौघांना पदके जाहीर झाली आहेत. त्यामध्ये एका अधिकाऱ्याला उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक तर तिघांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे. पीएमआरडीचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना उल्लेखनीय सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

याशिवाय नागरी क्षेत्रातील कामगिरीसाठी स्वतःच्या जीवाला धोका पत्करून इतरांच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या तिघांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये परमेश्वर बालाजी नागरगोजे यांना उत्तम जीवन रक्षक आणि अनिल दशरथ खुले आणि बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जीवन रक्षक पदक जाहीर झाले आहे. कारागृह सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेतील तिघांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Comments are closed.