Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी ही सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती बाबतीची सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. काही वेळा पुर्वी राज्य सरकारची बाजू मांडणार वकील मुकुल रोहतगी उपस्थित नसल्याने ही सुनावणी तहकूब करण्यात आली होती. मात्र, आता व्हीसीच्या माध्यमातून रोहतगी उपस्थित झाले होते. आणि सुनावणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबतीत गंभीर नसल्याची आरोप याचिका कर्त्यांकडून केला जात आहे.

राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसंच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या खंडपीठासमोरच सुनावणी होणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता या प्रकरणी सुनावणी सुरू झाली. परंतु यावेळी सरकारी वकील मुकुल रोहतगी हे अनुपस्थित होते. परंतु त्यानंतर काही काळासाठी न्यायालयानं ही सुनावणी स्थगित केली. दरम्यान, याप्रकरणी आजच सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.