Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हजेरी सहायकांनी संपर्क करण्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयान्वये शासन सेवेत समावेशन झालेल्या रोजगार हमी योजनेवरील हजेरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली ,18 जुले : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयान्वये शासन सेवेत समावेशन झालेल्या रोजगार हमी योजनेवरील हजेरी सहाय्यकांची सेवा दिनांक 31 मार्च 1997 पासुन सेवा निवृत्ती विषयक लाभाकरीता काल्पनिकरित्या ग्राहय धरण्यात आली आहे. याबाबत अंमलबजावणीरीता 23 मे 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
हजेरी सहायक व्हि. व्हि. चव्हान, सुरेश आत्माराम बोंदार, अमन गणपत रेहपाडे, रमेश गणपत बोंडरे, हिरकन गंगाराम दहारे, सेवकराम शिवाजी टेंबरे, उदाराम सिताराम बारसागडे, शोभेसिंग अमरसिंग
शिंदे, ज्ञानेश्वर काशिराम कर्मविर, भारत जिगर राऊत, गोवर्धन जनार्धन रायपुरकर, शंकरलाल रामलाल बरगावणे, निलकंट सुकाराम बरेवार, गोपाल क्रिष्णाजी चाहांदकर, एस. आर. कुलकर्णी, बि. आर. मोरे, ए. एस. पाटील, एस. एम. जोशी, व्हि. जि. जाधव एस. के. कावडे, आर. एल. मिसकीन, ए. आर. काळे, ङि एन. वाघमारे, माधव व्यंकटराव तेलगानवे, राम प्रसाद सांगले, ज्ञानोबा गंगाराम पांचाल, मनोहर भाऊराव भंदाडे, ग्यानिराम गोविंदा कोरे ( मय्यत), के. एस. सोनवणे यांचेबाबत हजेरी सहायक संघटनेकडे माहिती उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले आहे.
तरी संबंधीत हजेरी सहायकांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालय गडचिरोली येथे त्वरीत भेट द्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे यांनी केले आहे.

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.