Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भास्कर जाधव यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह

किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  19, ऑक्टोबर :-  शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह असून ते जे बोलले ते ऐकल पाहिजे. मात्र, हे लोक घाबरलेले, बिथरलेले आहेत. त्यामुळे असली कृत्य केली जातेय अस म्हणत शिवसेना नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.  मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते भाकर जाधव आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. त्याचेच पर्यवसान भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करून झाल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप आहे.

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारण भास्कर जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा असा संघर्ष निर्माण झाला असतानाच या घटनेमुळे आणखी काही नवा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशातच आता आमदार भास्कर जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भाजपा विरोधातील वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाल्याची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवरुन किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. पेडणेकर म्हणाल्या, भास्कर जाधव यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह असून ते जे बोलले ते ऐकलं पाहिजे.

मात्र, हे लोक घाबरेले, बिथरले आहेत त्यामुळे असली कृत्य केली जात आहेत. तुम्ही एका पक्षप्रमुखाला काहीही बोलता, संतोष बांगर काय बोलतात ते देखील ऐकलं पाहीजे, असं म्हणत शिवसेना नेत्या माजी महापौर यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिवाय गेले तीन वर्ष ज्या स्वायत्त संस्था होत्या त्याचा पण वापर केला जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आमचे चिन्ह गोठवले, आम्हाला मशाल मिळाली तरी देखील आम्ही घाबरलो नाही. त्यामुळेच असे प्रकार केले जात आहेत. शिवाय विवरण पत्रामध्ये सगळी माहिती असते. हल्ली कोणीही कोणाची माहिती मिळवू शकतं, सगळ्यांचे टार्गेट फक्त उद्धव ठाकरे आहेत. मी इतर ठाकऱ्यांबद्दल बोलणार नाही कारण ते मांडीला मांडी लावून बसले आहेत असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना देखील टोला लगावला.

हे देखील वाचा :-

Comments are closed.