Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरची तालुक्यातील मसेली आश्रम शाळेला आय.एस.ओ. दर्जा प्राप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. ४ फेब्रुवारी: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळेला नुकताच नामांकन दर्जा प्राप्त झाला असून येथील शालेय प्रशासनाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

आश्रमशाळा मसेली येथील मागील शैक्षणिक सत्रापासून शालेय व्यवस्थापन व सोयी सुविधांबाबत मुख्याध्यापक आर.एम. पत्रे यांचेसह सर्व शिक्षक तथा कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम भागातील आश्रम शाळेला आय.एस.ओ. दर्जाच्या क्रमवारीत आणले. याकरीता वेद असोशिएट संस्था नागपूर यांचे वतीने वेळोवेळी मूल्यांकन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याकरीता गडचिरोली सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांचे मार्गदर्शन व सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले नसेल येथील कार्यरत शिक्षक लाडे, चौधरी, डबले, शिक्षिका सोनवाने, जांभुळकर, सोनकुसळे, राहांगडाले, ढेकवार, व  अधीक्षक प्रमोद तुलावी इत्यादीसह यादव, कुमरे, मडावी, बोगा, कोडाप व बांडेबाई इत्यादी कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोलाचे योगदान लाभले हे विशेष.

वेद असोशिएट नागपूर निरीक्षक व पर्यवेक्षक विनोद कोल्हे, रोशन महल्ले व प्रजापती इत्यादींनी मुख्याध्यापक आर. एम. पत्रे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती प्रतिनिधींनी शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.