Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिवाळीच्या सुट्टीसाठी माथेरान राणीच्या चार फेर्‍या वाढणार.

वाढती संख्या लक्षात घेता शटल सेवेच्या फेर्‍यांमध्ये १४ नोव्हेंबरपासून वाढ करण्यात आली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क :- मुंबई जवढील पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेल्या मिनिट्रेनच्या फेर्‍या वाढविण्यात येणार आहेत. अमन लॉज ते माथेरान अशा दररोज आणखी चार फेर्‍या वाढविण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे 22 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक दिवशी अमन लॉज ते माथेरानदरम्यान 12 फेर्‍या चालविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पर्यटक आणि रहिवाशांच्या मागणीनुसार अमन लॉज आणि माथेरान दरम्यान ४ नोव्हेंबरपासून शटल सेवा सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीला दिवसाला फक्त ४ फेर्‍या सुरु केल्या. त्यानंतर दिवाळी सुट्टीमध्ये माथेरानला भेट देणार्‍या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता शटल सेवेच्या फेर्‍यांमध्ये १४ नोव्हेंबरपासून वाढ करण्यात आली. त्यानुसार दिवसाला ८ शटल सेवा धावू लागल्या. परंतु दिवाळीची सुट्टी २२ नोव्हेंबरपर्यंत असल्याने माथेरानला येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे शटल सेवांमध्ये आणखी ४ फेर्‍यांची भर घालण्यात आली आहे. रविवार २२ नोव्हेंबरपर्यंत अमन लॉज आणि माथेरान दरम्यान दिवसाला शटल सेवेच्या १२ फेर्‍या होणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाढ झालेली फेरी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी माथेरान येथून सुटून अमन लॉजला सकाळी ११.४८ वा. पोहोचणार आहे. दुसरी फेरी अमन लॉज येथून दुपारी १२ वाजता सुटून माथेरानला दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी वाजता, तिसरी फेरी माथेरानहून दुपारी २ वाजता सुटून अमन लॉजला दुपारी २.१८ वाजता, तर चौथी फेरी अमन लॉज येथून दुपारी २.३० वाजता निघून माथेरानला दुुपारी २.४८ वाजता पोहोचणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.