राजीनामा नव्हे; महापौर संदीप जोशीना कोरोना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १० डिसेंबर : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी महापौर पदाच्या राजीनामा दिल्याची चर्चा रंगली असतानाच एक नवीन माहिती पुढे आली आहे. त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आज याविषयीची माहिती त्यांनीच स्वत: देत आपल्या संपर्कातील लोकांनी तपासणीसह खबरदारी घेण्याचा सबुरीचा सल्ला दिला आहे. पदवीधर निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अॅड.अभिजित वंजारी यांच्याकडून पराभव स्वीकारल्यानंतर ते जवळपास अज्ञातवासात गेल्याने त्यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली. मात्र, पक्षनेतृत्त्वाने यासंबंधीचा इंकार केला, हे विशेष. सध्या हंगामी महापौरपदाची धुरा उपमहापौर मनीषा कोठे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
Comments are closed.