Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी विधानसभा क्षेत्रात भारत राष्ट्र समितीचे सभासद नोंदणी ला सुरुवात.

मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या शुभहस्ते सभासद नोंदणीचा श्रीगणेशा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मूलचेरा, 1 जून-  मुलचेरा तालुक्यातील मलेझरी या गावात दिपक दादा आत्राम यांनी सभेचे आयोजन करून त्यांना बी आर एस बाबतीत रूपरेषा सांगितले आणि आपण शेतकरी वर्गाचे कशे फायदे करायचे व आपल्या भागातील शेतकरी कसा मोठा होईल, त्याला कधी अडचण आली तर आपण कशी मदत करू या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही सदस्यता स्विकारावे असे संबोधन केले त्या नंतर, भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांच्या मार्गदर्शनाखाली 69 अहेरी विधानसभा क्षेत्राचे, माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वात आज सभासद नोंदनीला सुरुवात झालेली आहे या सभासद नोंदणी अभियानाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सदर कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत मंचावर आविस सल्लागार कवडुजी चल्लावार,आविस सल्लागार रामचंद्रजी शेडमाके,आविस सल्लागार भगीरथजी गायकवाड,बिआरएस नेते टिल्लूजी मुखर्जी,वेलगुर उपसरपंच तथा विधानसभा समन्वय उमेश मोहूर्ले,आलापल्ली माजी सरपंच दिलीप गंजीवार,आविस सल्लागार तथा आलापल्ली माजी ग्राप सदस्य महावीरजी अग्रवाल,आविस सल्लागार बंडू जुनघरे,विनोद झाडे,विजय मांदाळे,रमेश चल्लावार,बंडुजी झाडे,प्रतिष्ठित व्यक्ती कोरसुजी वनकर, माणिकचंद वनकर,खिरीदास झाडे,बंडुजी वनकर,जुलेख शेख,विनोद कावेरी,प्रवीण रेषे,सतीश पोरतेट,विनोद मडावी,माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते,तसेच सभासद नोंदणी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश नागोसे, तुफीन गायकवाड,दशरथ पोरेते,पत्रुजी कोडापे,अनिल शेडमाके,अमर चौधरी,निफुल गायकवाड,रोहित सिडाम,सौरभ झाडे,प्रणय शेडमाके,मयूर झाडे,शेखर पोरते,वैभव कन्नाके,प्रथम शेडमाके सह आविस व बि आर एस चे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.