कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य सेमाना देवस्थान (गडचिरोली) येथे स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा दिला संदेश
गडचिरोली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांचा वनकर्मचाऱ्यांसोबत विशेष उपक्रम
असोसिएशन ऑफ प्रोग्रेसीव अम्प्लाईज गडचिरोली आणि गडचिरोली वनवृत्तातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २० डिसेंबर: अंधश्रद्धा निर्मुलन आणि स्वच्छतेचा संदेश देणारे निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्य वनउद्यान आणि सेमाना देवस्थान परिसरात (गडचिरोली) संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला गडचिरोली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी पुष्पहार व दीप प्रज्वलीत करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
सेमाना येथील वनउद्यान, देवस्थान परिसर स्वच्छ करण्यासाठी गडचिरोली वनविभाग आणि गडचिरोली वनवृत्ताच्याकार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. याशिवाय सेमाना देवस्थानात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यासाठी शासनाने नियमावली दिली असून त्याचे पालन करण्याची अतंत्य गरज आहे. स्वच्छ परिसर ठेवून आपल्या आरोग्याचे आपणच काळजी कशी घ्यावी आणि आरोग्य समृध्द कसे ठेवता येईल याविषयी देवस्थानात येणाऱ्या भाविकांना माहिती देण्यात आली.
यासोबतच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी जीवनभर समाजासाठी अंधश्रद्धा निर्मुलन आणि स्वच्छतेचा संदेश अतिशय साध्या सोप्या भाषेत कीर्तन, प्रवचनद्वारे जनजागृती करून समाजाला जगण्याची नवी प्रेरणा दिली आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबांनी सांगितलेले कर्मसिद्धांत आचरणात आणून समाज प्रबोधनाचे तसेच समाजहिताचे कार्य आजही त्यांचे अविरत आहेत. आपल्यालाही समोर त्यांच्या विचारावर अविरत काम करण्याची गरज आहे असे वनकर्मचाऱ्यांसह भाविकांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी अरूप कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक, किशोर सोनटक्के ,अजय कुक्कुडकर, वन्यजीव प्रेमी नितेश सोमनकर, सिद्धार्थ मेश्राम, राजू कोडापे, दुर्गमवार, कैलास अंबादे,उमेश बोरावर ,रुपेश मेश्राम भरत अल्लीवर, भरत राठोर आदि वन कर्मचारी, देवस्थानात येणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.