Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर घेणार गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना विषयक आढावा बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ३० एप्रिल: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर शनिवार, दि. १ मे  रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ वा वर्धापन दिनोत्सवानिमित्य जिल्हयात दाखल झाले आहेत.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्यासमवेत कोविड-१९ उपाय योजनांबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आढावा बैठक घेणार आहेत. तसेच सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग (औषधे), गडचिरोली यांच्यासमवेत आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.