Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तालुक्यातील बहुतांशी समस्यांचे आढावा बैठकीत निराकरण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 23 मे – स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा सदस्य तथा माजी राज्यमंत्री आमदार धर्माराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आज अकरा वाजता झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील विविध विभागातील समस्या संदर्भात नागरिकांच्या प्रलंबित व चालू समस्यांचे निराकरण करण्यात आले.सभेला मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, प्रभारी तहसीलदार दिनकर खोत, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण व मुख्याधिकारी नगरपंचायत अहेरी उपस्थित होते.

यावेळी तालुका पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष रूषी सुखदेवे यांनी अहेरी- महागाव मार्गावरील हकीम फंक्शन हॉल समोरील रस्त्यावरून अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. सोबतच ग्रामपंचायत असल्यापासून नगरपंचायत झाल्यावरही अहेरीच्या मध्यवर्ती चौकात सार्वजनिक शौचालयाचा अभाव असल्याने मुख्याधिकाऱ्यांना धारेवर पकडुन पुढील काळात दानशूर चौकात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्याचे आदेश आमदार महोदयांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. तसेच आलापल्ली येथील क्रीडा संकुलात नियमित शारीरिक शिक्षकाच्या अभावी विद्यार्थी व खेळाडूंची साधने असूनही होत असलेल्या गैरसोयीचा मुद्दा गाजला असता अध्यक्ष आमदार महोदय तथा तहसील महोदयांनी लगेच सभा बोलावून मुद्दा सोडविण्याचे आश्वासन पत्रकार संघटनेला दिले. तसेच वीज वितरण विभागाला 2019 मध्ये अहेरी येथे 33 किलोवॉटचे केंद्र मंजूर झालेत. मात्र अजूनही काम सुरू झाले नसल्याचे प्रकरण सुद्धा यावेळी सुखदेवे यांनी लक्षात आणून दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सभेत पंचायत समितीतील मागील प्रलंबित प्रकरणे, पाणीपुरवठा विभागाने उन्हाळ्यात अजूनपर्यंत काही ठिकाणी पाणीपुरवठा न केल्याची प्रकरणे, आलापल्ली येथील काही नागरिकांची घराच्या पट्ट्या संदर्भातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या अखत्यारीतील प्रश्न,अहेरी नगरपंचायतीच्या वतीने अतिक्रमणधारकांना नोटीस दिले, पोलीस प्रशासन तयार आहे, मग सुरुवात कधी ? असा प्रश्न उपस्थित झाल्याने पावसाळ्यापूर्वी अतिक्रमणधारकांवर कारवाई सुरू करण्याचे आश्वासन यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दिले.स्वतः तहसीलदार महोदयांच्या धर्मपत्नी अहेरी खमणचेरू मार्गावर दोन्ही बाजूला गिट्टी टाकल्याने स्कुटी वरून खाली पडल्या. असेच नागरिकांनाही त्रास होत असलेल्या पीएमजीएसवायच्या अभियंत्याला येत्या 31 मे पर्यंत काम सुरू करून गिट्टी कामात आणा अथवा रस्त्यावर एका बाजूला करा अन्यथा दंडआकारण्याचे फर्मान तहसीलदार खोत यांनी अध्यक्षांच्या सहमतीने दिले.

पेरमीली प्राथमिक आरोग्य केंद्रामधील एमपीडब्ल्यूचे एकही पद सध्या भरले नसल्याचा मुद्दा सुद्धा एरणीवर आला. त्यालाही येत्या दिवसात सोडविण्याचे आश्वासन सभेचे अध्यक्ष आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले. सभेचे इतिवृत्त वाचून आयोजक प्र तहसिलदार दिनकर खोत यांनी पाहुण्यासह सर्वांचे आभार मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.