मुक्तिपथ द्वारा केले आमदार नरोटे यांचे अभिनंदन निवडणूकवेळी दिलेल्या दारूबंदी समर्थन वचननाम्याची दिली आठवण
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली:- जिल्हात दारूबंदीला समर्थन आहे, निवडून आलो अथवा नाही तरी गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी मजबूत करण्यासाठी सहकार्य करेन या विधानसभा निवडणुकीला उभे असताना दिलेल्या वचननाम्याची आठवण करून देत, आज गडचिरोली विधानसभा मतदार संघांचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे मुक्तिपथ संघटना प्रतींनिधीनी भेटून त्यांचे गडचिरोली कार्यालयात पुष्पगुच्छ व शोल देऊन अभिनंदन केले.
गडचिरोली, चामोर्शी व धानोरा या तीन तालुक्यातील मिळून 1300 सहयांचे एकूण 124 गाव व वार्डचे अभिनंदनाचे ठराव यावेळी आमदार नरोटे यांना देण्यात आले. गाव व वार्डातील अवैध दारूविक्री बंद करण्यात येत असलेल्या अडचणी पार करण्यासाठी सहकार्य करावे, याबाबत जवळपास अर्धातास संवाद यावेळी त्यांनी उपस्थित महिला सोबत साधला. यावेळी तिन्ही तालुक्यातून गाव व वार्ड संघटनेच्या प्रतींनिधी म्हणून 53 महिला सदस्य तसेच तालुका व जिल्हा चमूचे 12 सदस्य मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर इत्यादी मंडळी हजर होते.

तिन्ही तालुक्यातील ज्या गावात अवैध दारू अधिक प्रमाणात विक्री होते, मोठे तडीपारी पातळीचे गुन्हेगार आहेत यांच्यावर कारवाई व्हावी, दारूविक्रेत्याना वर्तन सुधारसाठी अधिक मोठ्या रक्कमेचे बॉन्ड घेतले जावे. दारूविक्रेत्याना शिक्षा व्हावी यासाठी काय करता येईल. दारू विक्री अधिक होते त्या गावात सुधार कार्यक्रम म्हणून काही मोहीम हाती घेता येईल का ? इत्यादि विविध मुद्द्यावर आमदार नरोटे यांचे सोबत यावेळी चर्चा करण्यात आली व दारूबंदीसाठी सकारात्मक पाऊले उचलन्यासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदन स्वीकारून अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या संबधित विभागाच्या अधिकार्यांना मी सांगतो व नियमित प्रयत्न करणार व दारूबंदी अधिक मजबूत करू असे म्हणत मुक्तिपथच्या कामाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. दर दोन ते तीन महिन्यात आपण भेटत राहू व दारूबंदी विषयावर आढावा घेऊन अडचणी कशा सोडविता येईल यासाठी सकरात्मक प्रयत्न करू असे त्यांनी सर्व महिलाना सांगितले व रजा घेतली.
Comments are closed.