खुशखबर पुरुष प्रवाशांना मिळणार लोकल प्रवासात मुभा हे आहे कारण?
खुशखबर आजपासून धावणार २ हजार 773 लोकल फेर्या.
मध्य रेल्वेवर 552 तर पश्चिम रेल्वेवर 201 फेर्यांंची वाढ.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई 2 नोव्हेंबर :- सर्व सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासाबाबत राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात एकमत झालेले नाही. तर दुसरीकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी,महिलांची संख्या वाढत असल्याने गर्दी होत आहे.परिणामी 2 नोव्हेंबरपासुन मध्य रेल्वेवर लोकलच्या अतिरक्त 552 तर पश्चिम रेल्वेवर 201फेर्या वाढविण्यात आल्या आहेत. या वाढीव फेर्यांमुळे मध्य रेल्वेवर दिवसभरात १ हजार 572 तर पश्चिम रेल्वेवर १ हजार 201 फेर्या होणार आहेत. यामुळे अत्यावश्यक सेवेकर्याचा गर्दीच्या वेळचा प्रवास सुकर होणार असुन उपनगरीय रेल्वे मार्गावरील एकुण फेर्यांची संख्या २ हजार 773 झाली आहे.
राज्य सरकारने मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. परंतु लोकलच्या गर्दीवर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत रेल्वेने सरसकट मुंबईकरांना लोकल प्रवास नाकारला आहे. त्यामुळे मुंबईकरांना लोकलची दारे कधी उघडणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यातच महिलांना सरसकट प्रवासाची मुभी दिल्याने लोकलच्या गर्दीत सुमारे २ लाखांची भर पडली आहे. या वाढत्या गर्दीला सामावुन घेण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेर्या वाढविण्यावर भर दिला आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर सध्या दिवसभरात लोकलच्या ७०४ फेर्यांमधुन सुमारे ४ लाख ५७ हजार तर मध्य रेल्वेवर ७०६ फेर्यांतून ४ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. वाढत्या गर्दीमुळे सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरच्या वेळी लोकलला प्रचंड गर्दी होते.यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने रविवारी अतिरिक्त ६१० फेर्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारपासुन उपनगरी रेल्वे मार्गावर दिवसभरात लोकलच्या २ हजार २० फेर्या चालविण्यात आल्या आहे. मात्र गर्दी काही कमी होण्याचे चिन्ह दिसून येत नसल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने पुन्हा सोमवारपासून 753 लोकल फेर्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
Comments are closed.