धक्कादायक…. ! पोलीस हवालदाराने स्वतावर गोळी झाडून केली पोलीस ठाण्यात आत्महत्या
आत्महयते च कारण अद्याप अस्पष्ट ,तुळींज पोलीस ठाण्यातील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 24 डिसेंबर:- मुंबईच्या नालासोपारामधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. 42 वर्षीय पोलीस हवालदाराने पोलीस ठाण्यातील शासकीय 9 एम एम च्या पिस्तुलमधून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्या जखमी पोलीस हवालदाराला उपचारासाठी मनपाच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, भोये हे गेल्या चार वर्षांपासून तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी नाईट शिफ्ट असल्याने ते प्रगती नगर चौकीत व आजूबाजूच्या परिसरात रात्र गस्तीवर होते. गुरुवारी सकाळी त्यांची रात्रपाळी संपल्यावर घरी जायच्या आधी तुळींज पोलीस ठाण्यात आठ वाजण्याच्या सुमारास आले. त्यांनी ही आत्महत्या का केली याचा पोलीस शोध घेत आहे.
या घटनेमुळे पोलीस आयुक्तालयासह पालघर जिल्ह्यातील पोलिसांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शोकाकुल वातावरण पसरले आहे. तुळींज पोलिसांनी या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भोये यांनी इतके टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या का व कोणत्या कारणांमुळे केली याचा पोलीस शोध घेत आहे.
Comments are closed.