Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुर्गम भागातील 31 ग्रापं परीसरात रेखाटले भिंतीचित्र

व्यसन थांबवून आरोग्य, पैसा व सुख कमवा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 30 ऑगस्ट – एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गर्देवाडा, वांगेतुरी, मेंढरी, गट्टा,जनबिया यासह संपूर्ण 31 ग्रामपंचायत मध्ये भिंतीचित्र रेखाटून दारू व तंबाखूच्या व्यसनापासून होणारे नुकसान पटवून दिले जात आहे. सोबतच  व्यसनांपासून सुटका करून आरोय, पैसा व सुख कसे कमावता येतो याबद्दल मार्गदर्शन देखील केले जात आहे.

महाराष्ट्र शासन, सर्च व गडचिरोली जिल्ह्यातील जनता यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून विविध ग्रामपंचायत परिसरातील भिंतीवर चित्र काढून व्यसन थांबवून दहा लक्ष रुपयांच्या योजनेचा कशाप्रकारे लाभ घेता येतो याबाबत जागृती केली जात आहे. या भिंतीचित्रातून शासनाने दारुबंदी व खर्रा, तंबाखू बंदी केली आहे. ग्रामपंचायत, ग्रामसभा व मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे कृती करा, आपल्या गावात बेकायदेशीर दारू, खर्रा विक्री बंद करा. दारू, खर्रा, तंबाखू सेवन सोडा, व्यसन उपचार करा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दारू, खर्रा,तंबाखूचे व्यसन थांबवून आरोग्य, पैसा व सुख कमवा असे आवाहन केले जात आहे. हा उपक्रम जिल्हाभरात राबवण्यात आला. एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गर्देवाडा, वांगेतुरी, मेंढरी, गट्टा, जांबीया, गुरूपली, येमली, बुर्गी, कांदोली, उडेरा, तुमरगुंडा, पुरसलगोंदी, नागुलवाडी, तोडसा, गेदां, हालेवारा, वागेझरी, कसंनसुर, सेवारी, मानेवारा, जवेली खुर्द, जवेली बु., घोटसुर, कोहका, वडसा खुर्द, जारावंडी, सरखेडा, सोहगाव, दिंडवी, कोटमी, चोखेवाडा या ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा राबविण्यात आला आहे. सोबतच मुक्तिपथ चमूतर्फे याबाबत सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.