Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरात किरकोळ कारणासाठी खून.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर, दि. २७ नोव्हेंबर: किरकोळ कारणावरून हातबुक्कीने बेदम मारहाण करून एका इसमाचा पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.३० वाजता खून करण्यात आला.
यातील अतुल धरमदास सहारे (५८) रा. बारसे नगर, कुंभारपुरा असे मृताचे नाव असून तर विकास गुणवंत साखरे (३२) असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी विकास हा मृत अतुल यांचा नातेवाईक आहे. या दोघांमध्ये गुरूवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दरम्यान, संतप्त होऊन आरोपी विकास याने अतुल यांच्या तोंडावर, पोटावर आणि छातीवर हातबुक्कीने मारहाण करून खाली पाडले. खाली पाडल्यानंतर तोंडाला पायाने ठेचून अतुल यांना ठार मारले. अतुल यांचा मृत्यू झाल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ माजली. आरोपी ठार मारून घटनास्थळवरून फरार झाला. याप्रकरणी अतुल यांचा मुलगा राजेश (३३) याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

Comments are closed.