पालघर नगरपरिषदेचे माझी वसुंधरा अभियान जन जागृती रॅलीने सुरु
पालघर, दि. ८ जानेवारी: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पालघर नगरपरिषदेने शहरात माझी वसुंधरा अभियान सुरु केले आहे.
1 जानेवारी २१ रोजी माझी वसुंधरा म्हणजेच हवा – पाणी – पृथ्वी – झाडे – प्रकृती ह्याचे रक्षण करण्याची शपथ नगरपरिषदेत घेतली .
आज शुक्रवार दि. ८ जानेवारी रोजी जनजागृती रॅली चे आयोजन केले होते.
या रॅलीत नगराध्यक्ष डॉ सौ उज्ज्वला केदार काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत ,मुख्याधिकारी स्वाती देशपांडे, आरोग्य सभापती अमोल पाटील, महीला व बालकल्याण सभापती सौ राधा पामाळे, नगरसेविका श्रीमती अनुजा तरे, नगरसेवक चंद्रशेखर वडे, नगरसेवक राजेद्र पाटील, केदार काळे, प्रजापती ब्रम्हकुमारी संस्था पदाधिकारी ,जायन्ट्स क्लब पदाधिकारी, सर्व कर्मचारी समाजसेवक उपस्थित होते .
Comments are closed.