Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूर करार जाळून अहेरी येथे महाराष्ट्र सरकारचा केला निषेध

दानशूर मुख्य चौकात विदर्भ राज्य आंदोलन समिती अहेरी द्वारे आंदोलन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : येथील दानशूर मुख्य चौकात २८ सप्टेंबरला नागपूर करार जाळून महाराष्ट्र सरकारचा तर स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी निर्देश करण्यात आले आहे.
त्या नागपूर करारात असे नमूद होते की, २८ सप्टेंबर १९५३ साली विदर्भाचे व उर्वरीत महाराष्ट्राचे काही काँग्रेस नेते एकत्र येऊन त्यांनी एक करार केला. विदर्भाला या नागपूर करारातील ११ कलमानुसार महाराष्ट्र राज्याच्या नोकरीमध्ये उच्च नौकऱ्यामध्ये, विकासाच्या निधीमध्ये, मंत्रीमंडळामध्ये, महामंडळामध्ये २३ टक्के वाटा देऊ असे कबूल
विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करून घेतले व तेव्हापासूनच विदर्भाचे शोषण सुरू झाले ज्यावर अन्याय सुरू झाला. तो आजपर्यंत सुरूच आहे.
विदर्भातील तरुणाला २३ टक्के नौकरी देण्याचे नागपूर करारामध्ये मान्य केले परंतु नौकऱ्या फक्त ७ टक्केच दिल्या, ४ लाख नौकऱ्या पळविल्या म्हणून विदर्भात बेरोजगारांची फौज उभी झाली. ७५ हजार कोटी सिंचनाचे पठविले, ५० हजार कोटी रस्त्याचे पळविले म्हणून विदर्भातील गोसीखुर्द सह १३१ धरणे अपूर्ण राहीले व रस्त्याचे जागळे सुद्धा विदर्भात उभे राहू शकले नाही. विदर्भाच्या विकासाला निधीच दिला नाही म्हणून विदर्भ बेरोजगार आत्महत्याग्रस्त, नक्षलग्रस्त, कुपोषणग्रस्त राहीला. विदर्भाचे शोषण करून पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला व विदर्भाला कोरडेच ठेवले.
ज्या नागपूर कराराचे पालनच केल्या गेले नाही व या करारानुसारच विदर्भाला महाराष्ट्रात सामील केले त्या कराराची आज विदर्भभर होळी करून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती अहेरीचे विलास रापर्तीवार, अतुल सिंगरू, सुहास मेश्राम, दिपक सुनतकर, शुभम निलम, कविश्ववर गोवर्धन, करन लोखंडे, मयूर पिपरे, व्यंकटेश येंपरेड्डीवार, सुधीर कोरेत, पराग निलम, प्रेकुमार कोडागुर्ले, रुपेश कोसरे, प्रा. ढेंगडे, श्रीनिवास भंडारी, विष्णू रापर्तीवार, राज कोरांटलावार आदी उपस्थित होते.

Comments are closed.