नागपूर हादरलं -नागपूरात तीन मुलांचा मृत्यू, कारमध्ये तिन्ही मुलं गुदमरुन मृत्यू
नागपूरच्या फारुखनगरमधील दोन लहान मुली आणि एक मुलगा खेळता खेळता बेपत्ता झाले होते.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नागपूर, 19 जून – नागपूर पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टेका नाका परीसरातून शनिवारी सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी खेळताना अचानक बेपत्ता झाली. त्या तिनही चिमुकल्यांचे मृतदेह काल आढळले. मुलांचा वाहनात गुदमरल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये दोन भावंडे तर एक त्यांची मैत्रिण आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आलिया फिरोज खान आणि आफरीन इर्शाद खान या दोघींचे वय सहा वर्षे होतं तर तौसिफ फिरोज खान चार वर्षांचा होता. फारुखनगरच्या मोहम्मदिया मस्जिदजवळ ते राहत होते. शनिवारी दुपारी खेळत असताना तिघेही बेपत्ता झाले होते. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला तरी सापडले नाहीत. शेवटी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी याबाबत सोशल मीडियावरूनही आवाहन केलं होतं.
पोलिसांनी लगेच त्या भागातील उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही कँमेऱ्याचे तपासणे सुरु केले आहे. मुले बेपत्ता होऊन २४ तासांचा अवधी उलटून गेल्यानंतरही पोलिसांना मुलांना शोधता आले नाही. पोलिसांनी अपहृत तीनही मुलांचे छायाचित्र आणि माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत नागरिकांना आवाहन केले होते. मुलांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी पुन्हा फारुखनगरात शोधणे सुरु केले. तीनही मुलांचे वय लक्षात घेता ते जास्त दूर गेले नसल्याचे पोलिसांना खात्री होती. त्यात रात्री आठ वाजता एका वाहनात तीनही मुले बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे पण वाचा :-
Comments are closed.