नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबईडेस्क, दि. ४ फेब्रुवारी: नाना पटोले यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. विधानसभा उपअध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केलेला आहे. आणि आता त्यांची कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
Comments are closed.