Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नांदेड पोलीस दलातर्फे सरदार वल्लभभाई पाटील यांचे जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड 31 ऑक्टोबर :- नांदेड – शासन परिपत्रकान्वये ३१ ऑक्टोबर २०२२ सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्ताने नांदेड पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्ताने एकता धाव चेही आयोजन करण्यात आले होते. सदर एकता धावची सुरूवात सकाळी ०७.३० वा. महात्मा गांधी यांचे पुतळयास मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देवुन हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात करण्यात आली. सदर धाव ही गांधी पुतळा, महाविर चौक, गुरुद्वारा चौक, जुना मोंढा टावर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करून समारोप करण्यात आला. तसेच शहरातील व ग्रामीण भागातील सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांच्या नेत्रत्वाखाली विवीध सामाजीक संस्था, शालेय विद्यार्थी, नागरीक यांचे सहभागातुन विवीध ठिकाणी एकता धावचे आयोजन करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या एकता धाव चे आयोजन मा. श्री निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु.) नांदेड मा. श्री. चंद्रशेन देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, मा. श्री. जगदीश भंडरवार, पोनि पोस्टे वजिराबाद, मा. श्री. विजय धोंडगे, रापोनि पो.मु. नांदेड, मा. श्री. शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड, शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर एकता धाव मध्ये सहभाग घेतला.

शासन परिपत्रकान्वये ३१ ऑक्टोबर, २०२२ ते ०६ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन व भ्रष्टाचार मुक्त भारत – विकसीत भारत साजरा केला जाणारा असून त्या अनुषंगाने आज रोजी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयातील अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मुलना बाबत शपथ दिली. तसेच जिल्हयातील व ग्रामीण भागातील सर्व पोस्टे येथील प्रभारी अधिकारी यांनी त्यांच्या अधिनिस्त अधिकारी व अंमलदार यांना शपथ देण्यात आली. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले. तसेच स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांची आज रोजी पुण्यतिथी निमित्ताने यांचे प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले आहे. सदर कार्यक्रमास  श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड,  निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड,  विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु.) नांदेड,  कुसे, पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष, शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड, इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थितीत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Comments are closed.