Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बोरी येथील नविन मोहरम दर्गा इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न..!!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते..!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, 31 जुलै :-  अहेरी तालुक्यातील बोरी येथील नविन मोहरम दर्गा इमारतीचे लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.बोरी येथील मोहरम दर्गाची इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने नविन दर्गाचे बांधकाम लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्यात आले सदर मोहरम दर्गा बांधकामाकरिता मोहरम समितीकडे स्वतची जमिन उपलब्ध नव्हते मात्र या बांधकामास शेख परिवार यांनी आपल्या स्वमालकीची जमिन दान देऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे.बोरी येथील मोहरम हा सण सर्वधर्मीयांकडून मोठया उत्साहात साजरा केला जातो. बोरी येथील मोहरम सणामध्ये महाराष्ट्रासह, तेलंगणा,आंध्रप्रदेश या राज्यातील प्रत्येक जाती धर्माचे नागरीक एकत्रीत येऊन हा सण थाटामाटात साजरा केला जातो. विशेष म्हणजे बोरी येथील मोहरम हा सण ब्रिटिश काळापासून चालत आहे तीच परंपरा आजही सुध्दा बोरी वासीयांनी कायम ठेवली आहे. मोहरम दर्गा नविन इमारतीचे बांधकाम सुरू व्हावे यासाठी मोहरम भाविकांनी देणगीच्या स्वरूपात सहकार्य करून नविन मोहरम दर्गा उभारला आहे व या नविन मोहरम दर्गा चे लोकार्पण सोहळा दी.२९ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झाले..!!

यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून व मोहरम दर्गाचे प्रतिष्ठित नागरिक श्री नारायण तलांडे, श्री बरीकराव तलांडे,श्री चंद्रू तलांडे श्री गोपाळा निकेसर श्री साईनाथ बोमकंटीवार यांच्यासह श्री प्रकाश कोलपाकवार, श्री अरुण कोलपाकवार,श्री मधुकर वेलादी,पांडुरंग रामटेके,सुरेश गंगाधरीवार,सुनील कोलपाकवार, सतीश कोलपाकवार, साईनाथ कोलपाकवार,जयंत बोमकंटीवार,संतोष बोमकंटीवार, अखिल गजाडीवार, विनोद ओल्लालवार,अमोल कोलपाकवार,आदि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन मोहरम समिती अहेरी चे तालुका उपाध्यक्ष अखिल कोलपाकवार यांनी केले तर आभार मोहरम समितीचे सदस्य कविराज मोहुर्ले यांनी मानले या कार्यक्रमाला यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी बोरी येथील मोहरम दर्गा चे सदस्य साई तलांडे, साईनाथ मडावी, दौलत मडावी,साईनाथ सोनटक्के, संतोष तलांडे, हरीचंद्र नीकेसर, ज्ञानेश्वर गड्डमवार, गोपाळा चांदेकर, अविनाश सोनटक्के, मुमताज शेख, सुभाष गंगूवार,लक्ष्मण आत्राम, शंकर गोरेडीवार,बाबुराव दुर्गे, विलास जंपलवार, मारोती सांगोजवार, आदींनी सहकार्य केले..!!

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.