Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओबीसी समाज संघटना 22 फेब्रुवारी च्या महामोर्चावर आग्रही.

नियमांचे पालन करूनच महामोर्चा काढण्यात येणार
ओबीसी समाज संघटना समन्वय समितीचा निर्धार.

ओबीसी संघटना बैठक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली: 14 फेब्रुवारी,

राज्यात विविध विभागाची पदभरती करण्याची घोषणा शासनाने केली आहे. मात्र, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यात आले नाही. तरीही पद भरती करण्याचा प्रयत्न शासनाकडून चालविला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील ओबीसी युवकांवर मोठा अन्याय होणार आहे. या अन्यायविरूद्ध लढा देण्यासाठी जिल्ह्यातील ओबीसी समाज संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून २२ फेब्रुवारीला महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा कोरोनाच्या नियमाचे पालन करून काढण्यात येणार असल्याची माहिती येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात १४  फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता आयोजित बैठकीत ओबीसी समाज संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून ओबीसीचे आरक्षण कमी करून ६ टक्के देण्यात येत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज असतानाही राज्यात असलेले १९ टक्के आरक्षण जिल्ह्यात केवळ ६ टक्केच देण्यात येत आहे. याविरूद्ध ओबीसी समाज बांधवांनी अनेकदा धरणे, मोर्चे, आंदोलन केले. तरीही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. यातच सध्या शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर विविध विभागात पदभरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना याचा कोणताही लाभ मिळणार नसल्याने आपल्या न्याय हक्कासाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचीही माहिती यावेळी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

संविधानिक मार्गाने मोर्चा काढावा, याकरिता ओबीसी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी मागीतली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली असली तरी हा मोर्चा आपल्या हक्कासाठी असल्याने काढण्यात यावा, असा या बैठकीला उपस्थित असलेल्या समाजबांधवांनी निर्णय घेतला आहे. शासकीय यंत्रणेला कोणताही त्रास होणार नाही, सध्या राज्यात सुरू असलेल्या कोरोना साथरोगाच्या नियमांचे पालन करून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचीही माहिती, यावेळी देण्यात आली.

मोर्चा होणारच!
मागील अनेक वर्षापासून ओबीसींचे मोर्चे काढण्यात येत आहे. तरीही शासन त्यांच्या न्याय मागण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे यावर्षी लाखोंच्या संख्येत मोर्चा काढून शासनाने लक्ष वेधून ओबीसी समाजाची वज्रमूठ बांधण्याचा निर्णय १४ फेब्रुवारीला आयोजित तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थित ओबीसी समाज बांधवांनी घेतला.

नियमांचे पालन करणार!
महामोर्चादरम्यान, मॉस्क  व सॅनिटॉयझर्स तसेच सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना समाज बांधवांना देण्यात येणार आहे. मात्र, हा मोर्चा सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या हक्काचा असल्यामुळे या महामोर्चात नियमांचे पालन करून मोर्चा काढण्यात येईल, असा निर्धारही ओबीसी समाजबांधवांनी घेतला आहे.

Comments are closed.