Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आकाशवाणी केंद्रावर कु. रक्षा गुरनुले विद्यार्थिनीची १९ नोव्हेंबर ला थेट मुलाखत प्रसारित.

शाळेबाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा छल्लेवाडाच्या विद्यार्थिनीची निवड.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. १६ नोव्हेंबर:- अहेरी तालुक्यात येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, छल्लेवाडा येथील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त ग्रामिण भागात शिक्षण घेत असलेल्या कु. रक्षा वसंत गुरनुले या विद्यार्थ्यांनीची,शाळेबाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत दि.१९नोव्हेंबर २०२०ला सकाळी १०:३०वाजता आकाशवाणी नागपुर केंद्रावर थेट मुलाखत प्रसारित होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता विकास कार्यक्रम गडचिरोली (नागपुर विभाग)अंतर्गत कोरोना संकटकाळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी मुलाखतीद्वारे सदर विद्यार्थिनीची स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत राजाराम केंद्रा अंतर्गत कु. रक्षा वसंत गुरनुलेची निवड करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या मुलाखतीत कु. रक्षा गुरनुले ला विचारण्यात आलेल्या शैक्षणिक विषयातील प्रश्नांची उत्तरे दिलखुलासपणे देण्यात आल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासोबतच समोर काय होणार हे प्रश्न विचारताच चांगले शिक्षण घेऊन भावी जीवनात मोठे अधिकारी बनण्याचे स्वप्न असल्याची प्रतिक्रिया मुलाखतीत दिली. दुर्गम भागातून समोर येण्यासाठी अहेरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, प्रथम फाऊंडेशनचे मार्गदर्शक श्रीकांत पावडे,राजेश गर्गम , केंद्रप्रमुख सुनिल आईंचवार, मुख्याध्यापक सामा सिडाम, वर्गशिक्षक समय्या चौधरी,सुरजलाल येलमुले,कल्पना रागिवार, राजेंद्र दहिफळे,मुसली जुमडे,बाबुराव कोडापे, तसेच आई अनिता वसंत  गुरनुले, वडील वसंत मोंडीमेरा  गुरनुले,आजोबा,आजी,काका, आत्या,यासह सर्वांनी सहकार्य केले आहे

Comments are closed.