जयंतीचे निमित्याने गडचिरोलीत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यावर प्रकाश :
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : भाजपचे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंतीचे निमित्य एकता सामाजिक शिक्षणसंस्था गडचिरोली द्वारा संचालित इंदिरा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एकता सामाजिक शिक्षणसंस्थेचे संस्थापक प्रकाश अर्जुनवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष चंशेखर भडांगे, प्रा. हर्षाली मडावी, प्रा. मनीषा येलमुलवार, प्रा. सुषमा बुरले, अधीक्षक सुनील गोंगले प्रामुख्याने उपस्थित होते. प्रकाश अर्जुनवार आणि चंद्रशेखर भडांगे यांनी आपल्या भाषणातून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. एका सर्वसामान्य ऊसतोड मजुराचा मुलगा देशाचा केंद्रीय मंत्री होतो ही असामान्य बाब आहे.
महाराष्ट्रात भाजपला वाढविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. १९९९ साली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री बनले. या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन जनतेच्या हिताचे कार्य केले. संचालन प्रा. राजन बोरकर व आभार प्रा. दीपक ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविधालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
हे ही वाचा,
Comments are closed.