Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

हिंगणघाट, 8 जानेवारी: राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आजंती शिवारात दोन मोटरसायकलच्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री 9.30 वाजताचे दरम्यान घडली. हा अपघात हैद्राबाद- नागपूर महामार्गावरील मारुती सुझुकी शोरुमजवळ झाला. यात आजंती येथील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते रमेश भोमले (78) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अजंती येथील शेतकरी रमेश भोमले आपल्या दुचाकीने आजंती येथून जाममार्गाकडे चुकीच्या दिशेने जात होते. दरम्यान पवन कुबडे (28 ) रा. हिंगणघाट हा जाम कडुन हिंगणघाटकडे दुचाकीने येताना दोन्ही दुचाकींची धडक झाली. यात रमेश भोमले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पवन कुबडे जखमी झाला. माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र जाम येथील सपोनि भरत कर्‍हाडे, सुधाकर कुमरे, अजय बेले, गौरव खरवडे, प्रदीप डोंगरे, सुनील श्रीनाथे व चालक ज्योती राऊत घटनास्थळी पोहचली. पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील पोलिसांच्या मदतीने जखमीला उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.