Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डोंबिवलीत एक रुपयात एक लिटर पेट्रोल तर अंबरनाथ मध्ये ५० रुपयात एक लिटर पेट्रोल! जाणून घ्या कसं?

पेट्रोल भरण्यासाठी तरुणांची भली मोठी रांग. स्वस्त पेट्रोल उपक्रमाच्या माध्यमातून भाजपला चपराक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवली युवा सेनेतर्फे उस्मा पेट्रोल पंप येथे एक रुपयात एक लिटर पेट्रोल असा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी पेट्रोल भरण्यासाठी तरुणांची एकच रांग लागली होती. पेट्रोलचा दर आज एक लिटरला १०२ रुपये असतांना एक रुपयात एक लिटर पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन शिवसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे केंद्र सरकारला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे अंबरनाथ पश्चिमेकडिल येथील विमको नाक्यावरील पेट्रोल पंपावर सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या वाहनचालकासाठी ५० रुपये लिटर ने पेट्रोल देण्यात आलं.

दरम्यान पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला वारंवार शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहेत. एकीकडे हे राजकारण सुरू असतांना नागरिकांना दोन तास का होईना पण आता १०२ रुपये लिटर असलेला पेट्रोल हे एक रुपये लिटरने मिळाल्याने थोडाफार का होईना पण दिलासा मिळाला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे – मंत्री विजय वडेट्टीवार

ओव्हरलोड तेंदूपत्ता बोदाची वाहतूक करणारा ट्रक आष्टी जवळील वैनगंगा नदीत कोसळून दोन ठार, तर एक जखमी

नागपूर विद्यापीठाचा 9,429 विद्यार्थ्यांना दणका

 

Comments are closed.