ब्रिटनमधून रिसोड इथं आलेल्या तिघांपैकी एक जण कोरोना बाधित आढळल्याने शहरात भीतीचं वातावरण
वाशिम दि.२८ डिसेंबर :- जिल्ह्यात ब्रिटन मधून एकूण 6 जण दाखल झाले असून 3 जण पांगर खेड इथं तर तिघे हे रिसोड शहरात आले आहेत. या सहा पैकी पांगरखेड येथील तिघे निगेटिव्ह आहेत तर रिसोड मध्ये आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांपैकी एक 32 वर्षोय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
या मध्ये कोरोना चा नवीन स्ट्रेन आहे की नाही हे पुण्याच्या तपासणीनंतर सिद्ध होईल. नवीन स्ट्रेन मुळं राज्य सरकारने खबरदारी चा उपाय म्हणून युरोप आणि मध्य आशियातुन विमानाने राज्यात परतलेल्या ची चौकशी केली असून त्यांची आर टी पीसी आर टेस्ट सुरू केली आहे. यामध्ये रिसोड येथे एकाच कुटुंबातील तीन जण शहरात आले असता यामधील एक 32 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून ,हा कोरोना चा नवीन स्ट्रेन आहे की नाही . हे तपासणीसाठी सदर रुग्णाचा अहवाल पुणे येथील व्हायरल लॅब कडे पाठविण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर दोघांची ही पुनर तपासणी होणार आहे .
Comments are closed.