जन्म दाखला घरबसल्या आता ऑनलाईन पद्धतीनं काढता येणार आहे… जाणून घ्या प्रक्रिया…
लोकसपर्श न्यूज नेटवर्क
जन्म दाखला आपल्या अनेक शासकीय कामांसाठी महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे, जे आपल्या जन्मावेळी काढलं जातं. अगदीच लहानपणी काढलेला हा जन्माचा दाखला आपल्याकढून हरवतो. आणि तो परत काढण्यासाठी मोठं पुन्हा त्या रुग्णालयामध्ये जावं लागायचं. मात्र आता ही प्रक्रिया सोपी झाली आहे. आता जन्माचा दाखला आपण केवळ घरी बसून काढू शकतो. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=2476 या अधिकृत संकेतस्थळावरून आपण जन्माचा दाखला काढू शकतो.
सर्वप्रथम आपल्याला या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तेथे नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. हा झाला आपला लाॅग ईन. आता जन्मदाखल्यासाठी अर्ज करण्यासाठी याच संकेतस्थळावर युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून लाॅग ईन करायचं. त्यानंतर बर्थ या पर्यायावर क्लिक करून ऍड बर्थ रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडावा. त्यानंतर आलेला फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, आईचे नाव, वडिलांचे नाव अचूक भरून, फॉर्म सेव्ह करायचा आहे. त्यानंतर जन्म दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची फोटो कॉपी स्कॅन करून अपलोड करायची आहे, आणि त्यानंतर सेव्ह करायचा.
आपण फाॅर्म योग्य पद्धतीनं भरला आहे का हे तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये दिसेल, ते अचूकपणे तपासून घ्यावे. त्यानंतर तुमचा अंतिम अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जाची पावती तुम्हाला दिली जाईल. अर्ज दाखल झाल्यानंत एका आठवड्यात तुम्हाला जन्म दाखला मिळेल.
तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीनंही जन्मदाखला काढू शकता. यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात जावं. तिकडे जन्म दाखला काढण्यासाठी फाॅर्म घ्यावा तो काळजीपूर्व भरून, आवश्यक ती कागदपत्र त्या फाॅर्मसोबत जोडून फॉर्म जमा करावा. अशा तऱ्हेनं तुमचा अर्ज दाखल केला जाईल.
जन्म दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे पालकांचे ओळखपत्र, जन्मस्थान सांगणारा पुरावा (रुग्णालयातील पावती), पालकांच्या लग्नाचं प्रमाणपत्र (पर्यायी) ही कागदपत्र आवश्यक आहेत. तर जन्म नोंदणीस उशीर झाला असल्यास अर्जदाराचं ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आई-वडिलांचं ओळखपत्र, जन्म झालेल्या रुग्णालयाचं प्रमाणपत्र, जन्म रुग्णालयात न झाल्यास पालकांचं शपथपत्र आदि कागदपत्रांची आवश्यकता असते.
Comments are closed.