विरोधकांची टीका अनाठायी अर्थसंकल्पीय अधिवशेन नागपूरला घेऊन विदर्भाला न्याय देणार, नाना पटोलेंची माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
भंडारा, दि. १२ नोव्हेंबर: आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार असल्याने विरोधकांकडून विदर्भावर अन्याय होत असल्याची टीका करण्यात येतेय, मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊन विदर्भाला मोठा न्याय मिळेल असे ऐतिहासिक अधिवेशन घेऊ, असेही नाना पटोले यांनी सांगितले आहे. भंडारा येथे नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते.
उपराजधानी नागपूरला होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन मुंबईला घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले होते. विरोधकांच्या आरोपांना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी खोडून काढले आहे. कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन यावेळी नागपूर ऐवजी मुंबईला होणार आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊ, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा फटका आता नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला बसणार असून त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई घेणार असल्याचे विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मिळून हिवाळी अधिवशेन मुंबईला घेण्याचा निर्णय घेतला.
नागपूर विधिमंडळाच्या परिसरातील इमारतींचा वापर कोविड सेंटर म्हणून करण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर, कोरोनामुक्त झाल्यानंतर नागपूरला अर्थसंकल्पीय अधिवशेन घेण्यात येईल, असंही नाना पटोले यांनी सांगितले.
Comments are closed.