Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत अग्निवीर योजनेतर्गत दोन दिवसीय अग्निवीर भरती मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन.

लोकसपर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: अग्निवीर योजनेतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आज आणि उद्या अग्निवीर भरती मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयडस मेटल्स अँड प्रायव्हेट लिमिटेड च्या संयुक्त विद्यमान या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.

आरमोरी इथल्या महात्मा गांधी कला, विज्ञान, वाणिज्य आणि स्व. एन. पी कोमर्स विद्यापीठात सकाळी 10 वाजता या मेळाव्याचे उदघाटन झालं, तर गोंडवाना विद्यापीठात दुपारी 12 वाजता मेळाव्याची सुरुवात होणार आहे. उद्या चामोर्शी इथल्या केवळरामजी हरडे महाविद्यालयात सकाळी 9 वाजता, तर अहेरी इथल्या श्री शंकरराव बेजलवार कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दुपारी 1 वाजता मार्गदर्शन मेळाव्याची सुरुवात होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागपूरच्या सेना भरती कार्यालयाकडून या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मेळाव्यात भरती प्रक्रिया, पात्रता निकष, सेवा कालावधी, वेतन आणि इतर सुविधाबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे

Comments are closed.