एसटी बसमध्ये विष घेऊन प्रवाश्याची आत्महत्या
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना डेस्क 04 जानेवारी:- जालना जिल्हातील गेवराई येथून एसटी बस मधून प्रवास करीत असताना एका अनोळखी इसमाने बसमध्येच विष प्राशन केल्याचा केल्याचा खळबळजनक प्रकार आज उघडकीस आलाय. उपचार दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात या प्रवाश्याची प्राणज्योत मालवली असून त्याची ओळख मात्र अद्याप पटू शकलेली नाहीये.
अंदाजे 50 वर्ष वयाचा एक अनोळखी इसम गेवराईहून अंबड जाण्यासाठी एसटी बस मध्ये बसला. बस अंबड जवळ पोचत असताना बसमध्ये दुर्गंधी येत असल्याची व एक प्रवाशी गंभीर असल्याचे प्रवाश्यांनी चालक-वाहकाच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्या प्रवाशाने विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याचं समजताच बस मध्ये एकच खळबळ उडाली. चालक आणि वाहकाने प्रवाश्यांच्या मदतीने सदर इसमास अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथील सामान्य रुग्णालय येथे दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सदर इसमाची ओळख अद्याप पटू शकली नसून पोलीस त्यांचा तपास करत आहेत.
Comments are closed.