राज्यातील शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार शासना मार्फतच करा, खाजगी कंपनी कडून होणारा अन्याय थांबवा,वंचित बहुजन आघाडीची अमरावती येथे मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. १२ डिसेंबर:- राज्य शासनाने अनेक विभागात शासकीय कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले त्यांचे मानधन आतापर्यंत शासनाच्या स्तरावरुन करण्यात येत होते. मात्र आता महाविकास आघाडीच्या सरकारने सीएनसी या खाजगी कंपनीला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचा व त्या जागा भरण्याचा अधिकार दिल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे.
कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार न होणे त्यांचे पगार कापणे याप्रकारचे अन्याय होत असतांना शासनाने कोणत्याही कंत्राटी कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता व कर्मचाऱ्यांना अल्टिमेट न देता हा निर्णय घेतला आहे, या त्रासाला कंटाळून राज्यात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या. याआधी या कंपनीवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये गुन्हे सुद्धा दाखल झाले आहे. असे असतांना देखील राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे व हा निर्णय रद्द करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ने अमरावती येथे केली. व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या निर्णयाचा निषेध केला.
या निर्णयाविरोधात येत्या २० डिसेंबर पासून आजाद हिंद मैदानात २० ते २५ हजार कंत्राटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत. यांच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे सुशिक्षित बेरोजगार तरुण व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जे संघटना आहेत यांच्या सोबत पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहेत. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी दिली.
Comments are closed.