Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वन महोत्सव सप्ताह निमित्ताने धम्मभूमी च्या परिसरात वृक्षारोपण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोरची दि.30 जुलै :-  बौद्ध समाज कोरचीच्या वतीने येथील धम्मभूमी च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
जुलै महिन्यात वन महोत्सव निमित्ताने वृक्षारोपण करायचे असते.दिवसेंदिवस होणाऱ्या बेसुमार वृक्षांच्या कत्तलींमुळे आणि पत्ताफळी ठेकेदार मार्च महिन्यात तेंदूची चांगली पाने उगवण्यासाठी जंगल जाळतात. त्यामुळे जंगलातील लहान रोपट्यांपासून बरेच वृक्ष जळून खाक होतात. यात पर्यावरणासहीत बेसुमार वनसंपदा नष्ट होते.त्याचा विपरीत परिणाम सजिव सृष्टीतील सर्व घटकांवर होत आहे. वृक्ष हे प्राण्यांसाठी खुपच महत्त्वाचे आहेत. प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजे आक्सिजन वृक्षच देतात. मनुष्याची पुढील पीढी जिवंत ठेवायची असल्यास प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने वृक्षारोपण केले पाहिजे.
दिवसेंदिवस पृथ्वीचे वाढत चाललेले तापमान, जमिनीची होणारी धुप, जमिनीचा दिवसेंदिवस उतरत जाणारा पोत, पर्यावरण प्रदूषणामुळे मानवी जिवनावर होणारे विपरीत परिणाम. हे सर्व टाळण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे असे यावेळी मुख्याध्यापक शालीकराम कराडे यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. विनोद चहारे, मुख्याध्यापक शालीकराम कराडे, चंद्रशेखर अंबादे गुरुजी,रमेश सहारे गुरूजी, माजी जि. प. सदस्या ज्योतीताई भैसारे,गिरधर जांभुळे,राका शहर अध्यक्ष अविनाश हुमने, चेतन कराडे,जया सहारे, छाया साखरे,पुनम अंबादे,सुरेश जमकातन ई. हजर होते.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘शर्वरी’ लघूचित्रपटातून टाकला स्किझोफ्रेनिया आजारावर प्रकाश.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.