Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क

बीड 27 ऑक्टो 20:- सावरगांव येथील दसरा मेळाव्यात सोशल डिस्टन्सचे कारण पुढे करून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेमुळे जिल्हयासह राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचेवरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. या वर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुन्हे दाखल करण्याचं सत्र आता माझ्यापर्यंत आलं आहे असं ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर पंकजाताईंवरील गुन्हा हा तर सत्तेचा गैरवापर अन् राजकीय जळफळाट असल्याची प्रतिक्रिया खा . डॉ . प्रितम मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

सावरगांव येथे दसरयाच्या दिवशी पंकजा मुंडे यांचा ‘ आपला दसरा ‘ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला . हा कार्यक्रम ऑनलाइन होता . कोरोनाच्या संकटामुळे भगवान भक्तीगडावर गर्दी करू नये , आपापल्या गावांतच कार्यक्रम करून राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या चरणी नतमस्तक व्हावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तांना केले होते. मात्र या गडावर प्रत्यक्षात भाषण करताना सोशल डिस्टनसिंग पाळण्यात आली नाही या कारणावरून पोलिस प्रशासनाने पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.