Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देसाईगंज इथल्या 520 विविध दारुच्या गुन्ह्रातला एकुण 61 लाख 77 हजार हून अधिक रुपयांचा मुद्देमाल पोलीसांकडून नष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांचे आदेशानुसार जिल्ह्रातल्या अवैध दारु विक्री करणा­ऱ्यांवर कठोर कार्यवाही सुरु आहे.

त्यानुसार विविध स्थानकांमध्ये दाखल गुन्ह्यातून जप्त केलेला मुद्देमाल अधिक काळ साठवून ठेवणं अडचणीचे ठरते. देसाईगंज इथल्या 2018 ते 2024 दरम्याच्या एकुण 520 गुन्हयांतल्या महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आज नष्ट करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही कारवाई न्यायालय आणि अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यांच्या परवानगीने करण्यात अली. यामध्ये विदेशी दारुच्या 180 मिलीच्या 2 हजार 666 बॉटल, विदेशी दारुच्या 2 लिटर क्षमतेची 1 बॉटल, विदेशी दारुच्या 1 हजार मिलीच्या 6 बॉटल, विदेशी दारुच्या 90 मीलीच्या 62 बॉटल, विदेशी दारुच्या 375 मीलीच्या 7 बॉटल, देशी दारुच्या 180 मिलीच्या 28 बॉटल, देशी दारुच्या 90 मिलीच्या 10 लाख 1015 बॉटल, 650 मिली बिअरच्या 29 बॉटल, 500 मिलीच्या बियरचे 245 टिन कॅन, 330 मिलीचे बियरचे 48 बॉटल, अर्थात 61 लाख 77 हजार 330 रुपयांच्या मुद्देमालाचा चुरा करून नंतर खोल खड्ड्यात पुरण्यात आला. तसंच या मुद्येमालाची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, वरिष्ठ पोलीस अभियान अधीक्षक यतिश देशमुख, वरिष्ठ पोलीस प्रशासन अधीक्षक एम. रमेश तसंच कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज इथल्या अधिकाऱ्यांनी पार पाडली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.