अहेरीच्या पोलिस निरीक्षकांनी अतिदुर्गम सिंगणपेठ गावात घेतली ग्राम भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. ५ फेब्रुवारी: अहेरी पंचायत समिती मुख्यालया पासून ४० कि.मी.अंतरावर असलेल्या अतिदुर्गम व अतिसंवेदनशील म्हणून ओळखणाऱ्या बोरी येथून १० कि.मी.अंतरावर असलेल्या सिंगणपेठ या गावात पोलिस निरीक्षक श्री प्रविण डांगे यांनी घेतली ग्राम भेट.

अनेक वर्षांपासून सिंगणपेठ या अतिदुर्गम भागात पोलिस निरीक्षक आल्याचे बघून नागरीकांनी केला आनंद व्यक्त.सिंगणपेठ हे गाव मुलचेरा तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहे. मात्र पंचायत समिती हि अहेरी असल्याने येथील नागरिकांना कार्यालयीन कामकाजा करीता मोठी धावपळ करावी लागते.सिंगणपेठ हे गाव अहेरी पोलिस स्टेशन हद्दीत असल्याने येथील पोलिस निरीक्षक श्री प्रविण डांगे यांनी सिंगणपेठ या गावात ग्राम भेट घेतली.
सदर भेटी दरम्यान गावातील नागरिकांच्या समस्या बाबत विचारना केली असता सिंगणपेठ गावात रस्ते, नाली,बस,पुल, पाणी व इतर अन्य प्रकारच्या समस्या बाबत सांगितले विशेष म्हणजे या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे गिरवण्यासाठी गावातून पायदळ जावे लागते बसेसची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवणावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे.स्वातंत्र्याच्या ७४ वर्षा नंतर सुद्धा या गावाचा विकास झाला नाही.

या भागात प्रमुख समस्या आवासुन उभ्या आहेत.या गावात जाण्यासाठी आजही पक्के रस्ते नाहीत पुल पाणी नाल्या नाहीत मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायत कडून दुर्लक्ष केले जात आहे. सदर नागरिकांची समस्या पोलिस निरीक्षक प्रविण डांगे यांनी ऐकून या समस्यांवर त्वरीत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने बेरोजगार युवक व युवती करीता रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व्यवसायीक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण भागातील गरजू व गरीब युवक व युवती करीता अँटोमोबाईल, हाँटेलमँनेजमेंट,या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे करीता आपणास रोजगार उपलब्ध होईल असे सांगितले.
यावेळी पो. हवालदार दिगंबर गलबले, देवराव पेंदाम, हरीदास कांबळे, पो.शिपाई अजय तेलंगे, नानाजी सोमनपल्लीवार तसेच सिंगणपेठ गावातील बाल विद्यार्थ्यी युवक व युवती अन्य नागरीक उपस्थित होते.
Comments are closed.