Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ताला ठोकोच्या धसक्याने प्रलंबित कामे त्वरीत करण्याची हमी


गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दिलासा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

आरमोरी, दि. २८ सप्टेंबर: उप भुमि अभिलेख कार्यालय आरमोरी येथील कर्मचाऱ्यांच्या कामचुकार पणामुळे अनेक नागरीकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी मागील एक वर्षापासून अनेक नागरिक वारंवार चकरा मारुन देखील नागरीकांचे कामे करुन दिले जात नव्हते यांची तक्रार अनेक नागरीकांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या कडे लेखी दिली होती.जनतेचे कामे मार्गी लावण्यासाठी आज दिनांक २८ सप्टेंबरला भुमि अभिलेख आरमोरी कार्यालयाला ताला ढोकण्याचा इशारा दिला होता.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी तहसीलदार पोलिस स्टेशन यांना पुवसुचना दिली होती यात प्रलंबित समस्या घेऊन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनी शेतकऱ्यांनी उप भुमि अभिलेख कार्यालयाला कुलुप ठोकणार यासाठी धडक दिली असता पोलिस प्रशासनाने अडविल्याने दरवाज्या समोर ठिय्या आंदोलन माडुन विविध प्रकारांचे नारेबाजी. करुण टाला ढोकनार त्याच वेळी उप अधिक्षक आंबेकर मैडम भुमि अभिलेख कार्यालय आरमोरी यांनी आंदोलन करण्याच्या पुढे येऊन प्रलंबित शेतकऱ्यांचे प्रश्नन मागी लावण्याचे आश्वासन दिल्याने व पोलीस विभागाच्या मध्यस्थिने आंदोलन मागे घेण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसच्या सचिव उज्वला मडावी सामाजिक कार्यकर्ते भिमराव ढवळे सरपंच मगरु वरखडे, उपसरपंच विश्वेशर दरो ग्रा प.सदस्य भोलेनाथ धानोरकर, ग्रापचायत सदस्य मोतीलाल लिंगायत दिगाबर धाईत ग्रामपंचायत सदस्य दर्शना घोडाम अशोक मिसार सचिव वरखडे प्रदिप सडमाके दिपक चाहादे रविंद्र रोहणकर गजानन घरत के.एल. ऊसेडी सुनिल कुमरे प्रितम धोडणे, भैया खडारकर यासह मोठ्या संख्येनी शेतकऱ्यांरी उपस्थित होते.

Comments are closed.