महाराष्ट्र वन विभागात भरतीची तयारी; वनसेवक आणि वनरक्षक पदांसाठी संधी!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, जून १८ : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील वन विभाग लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे. वनसंवर्धन आणि जंगलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वनसेवक (Forest Guard) आणि वनरक्षक (Forest Guard) या पदांसाठी भरती होणार असून, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर प्राथमिक माहिती नुकतीच समोर आली आहे.
शैक्षणिक पात्रता : वनसेवक (Forest Guard): उमेदवार किमान १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असावा.
वनरक्षक: उमेदवाराने १२वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा:सर्वसाधारण (General) प्रवर्ग: १८ ते २७ वर्षे..
मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक: १८ ते २७ वर्षे..
खेळाडू (Sports Quota): १८ ते २७ वर्षे..
ℹ️ इतर आवश्यक माहिती:
अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (👉 mahaforest.gov.in) जाहीर होणार आहे.
भरती संबंधित अपडेट्ससाठी तुम्ही वन विभागाच्या अधिकृत ट्विटर/X हँडलला फॉलो करू शकता 👉 @MahaForest
वनविभागाशी थेट संवाद साधण्यासाठी ‘हॅलो फॉरेस्ट’ हा टोल-फ्री क्रमांक १९२६ देखील उपलब्ध आहे.
अभ्यासक्रम, भरती प्रक्रिया, शारीरिक चाचण्या, परीक्षा पद्धती याबाबतची सविस्तर माहिती लवकरच अधिकृतपणे प्रसिद्ध होणार आहे.
तरुणांसाठी सुवर्णसंधी!
महाराष्ट्रात निसर्गप्रेम, जंगल-संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या तरुणांना वन विभागात भरती होण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. शासनाने वनसेवा अधिक सक्षम करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक युवकांना नोकरीची दारे खुले होणार आहेत.
✅ टीप: अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत कोणत्याही बनावट लिंक किंवा फेक जाहिरातींना बळी पडू नये. केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करा.
संपर्कासाठी:
https://mahaforest.gov.in
📞 हॅलो फॉरेस्ट टोल-फ्री क्रमांक: १९२६ @MahaForest – Twitter/X
Comments are closed.