गडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणाबाबतच्या तयारीला सुरुवात.
जिल्हा व तालुका कृती दलाची स्थापना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.08 डिसेंबर: कोविड-19 महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाची मोहिम पुढिल महिन्यात राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हयात जिल्हा व तालुकास्तरावर कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाईन वकर्स, नंतर 50 वर्षा पेक्षा जास्त वयाचे आणि 50 वर्षाच्या आतील आजारी (कोमॉर्बीड) व्यक्तींना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस टोचली जाणार आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वकर्सची माहिती व 50 वर्षा पेक्षा जास्त वयाचे तसेच 50 वर्षापेक्षा कमी वयाचे मात्र कोमॉर्बीड लोकांची माहिती तातडीने जमा करण्याचे आदेश दिले. सदर बैठकीत लसीकरण्याच्या अनूषंगाने आवश्यक नियोजन करण्यात आले. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शिवाद, अति. पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर तसेच विविध संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी पथकांची निर्मिती होणार –जिल्हयातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची 297 पथके निर्माण करुन लसीकरण प्रक्रिया राबविली जाणार आहे. एक पथकात पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. यामध्ये सहभागी सर्व सदस्यांना लसीकरण प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्यामार्फत लसीकरणाची मोहिम यशस्वी केली जाणार आहे.
साठवणूक -वाहतूक-लसीकरण यावर नियोजन – लसीकरण मोहीम राबवित असताना लस उपलब्ध झाल्यानंतर ती थंड तापमानात ठेवावी लागते. त्याअनुषंगाने जिल्हा-तालुकास्तरावर लसीची साठवणूक व वाहतूकी बाबत नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष लसीकरण करण्याची ठिकाणांबाबत संबंधीतांना सूचना देण्यात आल्या आहेत.
लसीकरणाबाबत अफवा, गैरसमजांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी कोरोना संसर्गाबाबत जगभर विविध लसीं बाबत सामाजिक माध्यमांवर माहिती प्रसारीत होत आहे. या अनुषंगाने उलट सूलट चर्चावर नागरिकांनी विश्वासु ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी यावेळी केले. चूकीच्या माहितीबाबत व झालेल्या गैर समजांबाबत आरोग्य विभागाकडून खात्री करावी. तसेच खात्री झालेली माहितीच इतरांना पाठवा किंवा सांगावी. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार संपूर्ण लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे.
जिल्हा कृती दलात विविध विभागांचा समावेश – जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांचा या टास्क फोर्स मध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकरी, पोलीस अधिक्षक, प्रकल्प अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (महिला व बाल कल्याण), सहायक आयुक्त समाज कल्याण, शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तसेच इतर काही अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण लसीकरण मोहिमेबाबतचे सनियंत्रण या समितीमार्फत केले जाणार आहे.

Comments are closed.