गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकिची तयारी अंतिम टप्प्यात
- 150 ग्रामपंचायतीत एकुण 486 मतदान केंद्रांवर होणार मतदान
- प्रशासनाकडून मतदारांना मतदान हक्क बजावण्यासाठी आवाहन
गडचिरोली दि. 18 जानेवारी: जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि.20 जानेवारी रोजी 150 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार असून त्याची तयारी अंतिम टप्याानत आली आहे. 20 जानेवारी रोजी सकाळी ठिक 7.30 वा ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हयातील सहा चामोर्शी, मूलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा तालुक्यातील 486 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये संबंधित गावातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या सहा तालुक्यातील 150 ग्रामपंचायतीमधील 2 लाख 49 हजार 638 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला 1 जाख 21 हजार 8955 तर पुरूष 1 लाख 27 हजार 741 आहेत. निवडणूकिसाठी 486 प्रभागामधून 1170 जागांसाठी 2815 उमेदवार आपले मत आजमावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून 2166 कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी 486 मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य घेवून पोहोचत आहेत.
तालुकानिहाय मतदार आकडेवारी :
चामोर्शी – एकुण ग्रामपंचायती 65, मतदान केंद्र-209, मतदार – 106154
मूलचेरा – एकुण ग्रामपंचायती 14, मतदान केंद्र-48, मतदार – 31627
अहेरी – एकुण ग्रामपंचायती 28, मतदान केंद्र-96, मतदार – 53691
एटापल्ली – एकुण ग्रामपंचायती 14, मतदान केंद्र-46, मतदार – 21939
भामरागड – एकुण ग्रामपंचायती 2, मतदान केंद्र-6, मतदार – 2320
सिरोंचा – एकुण ग्रामपंचायती 27, मतदान केंद्र-81, मतदार – 33907
Comments are closed.