Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचे मालमत्ता विषयक हक्क,संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क, दि. १६ डिसेंबर : कोविड प्रादुर्भावामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. मागील दोन वर्षात कोविड मुळे विधवा झालेल्या महिलांना त्यांच्या मालमत्ताविषयक हक्कापासून वंचित ठेवल्याअसल्याने महिलांचे मालमत्ताविषयक व अन्य आर्थिक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली.

“संबंधित महिलेस तिचे आर्थिक व वित्तीय हक्क नाकारले जात आहेत किंवा कसे याबाबत माहिती करून मदत करावी. संबंधित महिलेबाबत पतीची स्थावर मालमत्ता, वित्तीय साधनसंपत्ती, उत्पन्न याबाबत वारसा हक्क नाकारणे, कौटुंबिक कारणांनी किंवा अन्य प्रकारे स्थावर तसेच जंगम मालमत्तेवर व उत्पन्नावर असणारा संबंधित महिलेचा हक्क नाकारणे. स्त्रीधन, संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे मालकी असणारी मालमत्ता यापासून महिलेस वंचित ठेवणे , संबंधित महिला व तिच्या मुलांना घरगुती गरजांसाठी आवश्यक साधनसंपत्तीपासून वंचित करणे,संबंधित महिलेस राहत्या घरामध्ये प्रवेशास निर्बंध करणे याबाबतची माहिती संरक्षण अधिका-यास द्यावी, असे महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चक्क रस्त्यावरच वाघाने हल्ला चढवून महिलेला केले ठार

आजपासून दोन दिवस सरकारी बँक कर्मचारी संपावर; काम प्रभावित होणार

 

 

 

Comments are closed.