जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त अहेरीत जनजागृती कार्यक्रम
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 14 जुलै – शंकराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालय येथे दिनांक काल जागतिक लोकसंख्या निमित्ताने आजीवन अध्ययन व सेवा केंद्र या विभागाकडून कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश लाभसेटवार यांच्याअध्यक्षतेखाली करण्यात आले.
अध्यक्षीय पुष्प गुंफताना पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रवींद्र हजारे,इंग्रजी विभाग प्रमुख हे होते. यावेळी लोकसंख्या वाढीचे सामाजिक जीवनावर कसे दुष्परिणाम होतात हे उदाहरणासह विद्यार्थ्यांना त्यांनी पटवून दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आजीवन अध्ययन व सेवा केंद्राचे संयोजक प्रा. प्रभाकर घोडेस्वार यांनी केली. यावेळी प्रा.जंगमवार, प्रा. बनसोड प्रा.गौरकार, प्रा. तेलंग, प्रा.पेंदाम, प्रा. घोनमोडे व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
हे पण वाचा :-
Comments are closed.