Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आशेरीगड संवर्धनासाठी दुर्गमित्रांचा नियोजित आराखडा प्रकाशित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर, दि. २८ फेब्रुवारी: पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक डोंगरी दुर्गांत आशेरीगडाचे मानाचे स्थान आहे. ऐतिहासिक पालघर जिल्ह्याची गेली अनेक वर्षे विविध माध्यमातून कमी अधिक प्रमाणात आशेरीगड संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर अंतर्गत नुकताच भुईसपाट झालेल्या राजसदरेचे संवर्धन करून जतन करण्यात आले. आगामी राजसदर आशेरीगडाचे संवर्धन करण्यासाठी किल्ले वसई मोहीम परिवार, महाराष्ट्र व युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित राजसदर संवर्धन आराखडा प्रकाशित करण्यात आलेला आहे. यात मुख्य सदर स्थान, बाहेरील चौथरा, बाहेरील पायरी मार्ग, अंतर्गत पायरी मार्ग, मुख्य सदर खोली, सदर भिंती कोट, सदर बाहेरील असमान भिंती कोट (भुईसपाट), समांतर बालेकिल्ला मुख्य तटबंदी, प्रवेशद्वार, शिल्पे व मुख्य चौथरे इत्यादी कार्याचे नियोजन स्पष्ट करण्यात आलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर अत्यंत महत्वाच्या दुर्गसंवर्धन मोहिमेत विविध दुर्गसंवर्धन संस्था आपले सक्रिय योगदान देण्यासाठी तत्पर राहणार असल्याने राजसदर संवर्धनास गती प्राप्त होणार आहे. शिवपुत्र छत्रपती शंभाजी महाराज यांच्या सैन्याने सन १६८३ मध्ये पालघर जिल्ह्यातील अनेक गिरिदुर्ग जिंकले त्यात आशेरी गडाचा समावेश होतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आशेरी गडावरील मराठमोळ्या बांधणीच्या बालेकिल्ला राजसदर संवर्धनासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दुर्गमित्र सातत्याने मोहिमा करत आहेत. नुकताच राजसदर व श्री आशेरी गड देवी तांदळा संवर्धनाचे वृत्त विविध माध्यमातून प्रकाशित झाल्याने आशेरी गड पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. जिल्ह्यातील तसेच मुंबई परिसरातील दुर्गमित्र संघटनेच्या प्रतिनिधींनी नुकताच सदर संवर्धन कार्याची प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली. सध्या प्रकाशित करण्यात आलेल्या आराखड्यात अंदाजित उपलब्ध होणारे अवशेष नमूद करण्यात आलेले नाहीत. सदर सविस्तर तपशील लवकरच काही सूचना व अभ्यास टिपणे लक्षात घेऊन प्रकाशित होईल. नुकताच किल्ले वसई मोहीम परिवार प्रमुख व इतिहास अभ्यासक डॉ श्रीदत्त नंदकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राजसदर मोजमापे व निरीक्षणे नोंदणी तपशील सविस्तरपणे नोंदवला गेला. 

युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरचे अध्यक्ष श्री प्रशांत रामचंद्र सातवी यांच्या मते “आशेरी गड राजसदर नियोजित आराखडा अत्यंत मनोबल वाढवणारा असून नरवीरांची स्मृती जपण्यासाठी सातत्याने कष्ट घेण्यासाठी आम्ही सर्व दुर्गमित्र तत्पर राहुत असा विश्वास देतो.” 
किल्ले वसई मोहिम परिवाराच्या दुर्गसंवर्धन मोहीम प्रमुख सौ दिपाली पावसकर यांच्या मते “आशेरी गड संवर्धनासाठी नियोजित आराखडा व निरीक्षणे अत्यंत महत्त्वाचा दुवा असून सदर नोंदी मुळे आगामी काळात विविध पातळीवर संवर्धनासाठी चांगला तपशील उपलब्ध होईल.” 

Comments are closed.