Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामंपचायतस्तरीय पुरस्कार विजेत्या कर्तबगार महिलांचे अभिनंदन – मंगलप्रभात लोढा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 30 मे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस. यावर्षी अहिल्यादेवींची 298 वी जयंती देश साजरा करीत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे धर्मनिष्ठा, कर्तव्यपारायणता आणि भक्ती व शक्तीचे अद्वितीय उदाहरण आहे. यांच्या जयंतीचे अवचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायतस्तरावर समाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय संदर्भांकीत शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाने घेतलेला आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण 27897 ग्रामपंचायतीं मध्ये 139485 महिलांनी पुरस्कार मिळणेसाठी अर्ज सादर केले होते.
शासन निर्णयानुसार गठीत समितीच्या माध्यमातून छाननी करून राज्यतील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सुमारे 55794 महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ आणि रोख रक्कम रू. 500/- देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी उद्या दिनांक 31.05.2023 रोजी त्यांचे जन्मगांव श्रीक्षेत्र चौंडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उप-मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत जयंती सोहळा संपन्न होत आहे. या सोहळयात अहमदनगर जिल्हातील 10 ग्रामपंचायतींमधील पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान होणार आहे तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी 15 ग्रामपंचायतींधील 60 पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सोहळा महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे दुपारी 3.00वाजता संपन्न होत आहे.
हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.