रजनीकांत यांची प्रकृती बिघडली
हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हैदराबाद डेस्क 25 डिसेंबर :– दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा रक्तदाबामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं. इथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रजनीकांत बरे व्हावेत म्हणून चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. उच्च रक्तादाबाशिवाय रजनीकांत यांना इतर त्रास नसल्याची माहिती अपोलो रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
सुपरस्टार रजनीकांत हे सध्या अन्नाथे (Annaatthe) या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्या चित्रपटाच्या सेटवरील 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आता चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 14 डिसेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते. ज्यानंतर सेटवर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यानंतर शूटिंग थांबविण्यात आले आहे. 22 डिसेंबरला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती ती निगेटिव्ह आली असल्याची माहिती अपोलो रुग्णालयानं दिली आहे.
Comments are closed.