Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२०२५ च्या वुशू क्रीडा स्पर्धेत अथेन्स ग्रीस येथे राकेश बेदी करणार भारताचे प्रतिनिधित्व.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रायगड:  उरण तालुक्यातील आय एन एस टुनिर (भारतीय नौदल) उरण येथील अग्निशमन मुख्यालयातील नागरी संरक्षण कर्मचारी राकेश बेदी यांची अथेन्स ग्रीस येथे २०२५ मध्ये होणाऱ्या अ‍ॅक्रोपोलिस आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेसाठी भारतीय वुशू संघात निवड झाली आहे.

रायगड, (एमएच) येथून त्यांची ७५ किलो वजनी गटात निवड झाली आहे.राकेश मनोज बेदी हे राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय वुशू, जु-जित्सू आणि ज्युडो खेळाडू आहेत आणि प्रमाणित फिटनेस प्रशिक्षक पातळी ०४ आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यांची अलिकडेच २८ फेब्रुवारी २०२५ ते २ मार्च २०२५ दरम्यान ग्रीसमधील अथेन्स शहरात होणाऱ्या अ‍ॅक्रोपोलिस आंतरराष्ट्रीय वुशू चॅम्पियनशिप २०२५ साठी निवड झाली आहे. त्यांनी ३७ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये गोवा क्वार्टर फायनलिस्ट, वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२४, नॉर्डिक कप २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भाग घेतला होता.

२०२५ वर्ल्ड गेम्स (चीन )ॲथलीट आणि आशियाई चॅम्पियनशिप २०२५ (जॉर्डन) आगामी कार्यक्रमांसाठी देखील त्याची निवड झाली आहे.राकेश बेदी यांनी आपले कमांडिंग ऑफिसर, आयएनएस तुनीर, कार्यकारी अधिकारी आयएनएस तुनीर, कमांडर एन राजेश खन्ना, लेफ्टनंट कमांडर शाहीन हुसेन, सुहेल अहमद (वुशू इंडिया), प्रशिक्षक किलमन पाउलो फर्नांडिस आणि वेस्टर्न नेव्हल कमांड (भारतीय नौदल), वुशू असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र जू-जित्सू असोसिएशन या सगळ्यांनी दिलेल्या सर्व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. राकेश बेदी हे एक चांगले आणि आगामी वुशू, ज्युडो/जु-जित्सू (ॲथलीट),भारतीय नौदल आणि महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणारे उत्तम खेळाडू आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.